भाई शिंदे यांचे आव्हान
| खोपोली | वार्ताहर |
शिवसेनेशी गद्दारी करणार्यांनी पहिल्यांदा स्वतःचा इतिहास तपासून पाहावा आणि नंतरच आमच्या पक्षप्रमुखांवर बोलावे. वेळ आली तर शिवसैनिक त्यांनाही उत्तर दिल्याशिवाय गप्प बसणार नाही. असा सज्जड इशारा शिवसेना रायगड जिल्हा सहसंपर्कप्रमुख भाई शिंदे यांनी दिला आहे. येणार्या दसरा मेळाव्याला खालापूर तालुक्यातील हजारो शिवसैनिकांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या विचारांचे सोने लुटण्यासाठी जायचे आहे. यासाठी आतापासूनच शिवसैनिकांनी तयारीला लागा असे आवाहनही त्यांनी केले.
शिवसेनेच्यावतीने खालापूर तालुक्यातील शिवसेना पदाधिकारी आणि प्रमुख कार्यकर्त्यांना मार्गदर्शन कार्यक्रम तांबाटी ग्रामपंचायतीच्या सभागृहात कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी नविनदादा घाटवळ, डॉ. सुनिल पाटील, नितीन सावंत, उत्तम कोळंबे, एकनाथ पिंगळे, संपर्कप्रमुख उमेश गावंड, अनिल सानप, महिला आघाडीच्या अनिता पाटील, महेश पाटील अनिल जाधव, उत्तम कोळंबे, हुसेन खान, भाऊ सणस,अरुण गायकवाड, निखिल पाटील, प्रशांत खांडेकर, देवेंद्र देशमुख, नितीन मोरे, विवेक पाटील, मंगेश पाटील, अशोक मराजगे, अनिल जाधव, संपत हाडप,शैला भगत, सुविधा विचारे, वैजयंती गायकवाड़, सारिका निकम, आसावरी घोसाळकर, सुलक्षणा दाभाड़े, रेश्मा कदम, सुखदा बने, मंदा भोसले, माणिकताई देशमुख, इंदु पाटील, सुरेखा कदम, मानसी कदम यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आगामी काळात येणार्या निवडणुकांमधून गद्दारांना त्यांची जागा कुठे आहे हे समजेल, नंतरच त्यांनी निष्ठेच्या गोष्टी शिकविण्याची भाषा करावी अशा शब्दात शिवसेनेचे संपर्कप्रमुख भाई शिंदे यांनी हल्लाबोल केलाय.