सिडकोकडून 68.4 हेक्टर कांदळवन क्षेत्राचे वन विभागाला हस्तांतरण

पनवेल | विशेष प्रतिनिधी |

सिडकोकडून 21 फेब्रुवारी 2022 रोजी दुसऱ्या टप्प्यात पनवेल तालुक्यातील, सिडको अधिकारक्षेत्रातील 68.4 हेक्टर कांदळवन क्षेत्राचे हस्तांतरण वन विभागाच्या कांदळवन कक्षाला करण्यात आले. डॉ. संजय मुखर्जी, उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक, सिडको यांच्या हस्ते श्री. एम आदर्श रेड्डी, विभागीय वन अधिकारी, मुंबई कांदळवन संधारण घटक यांना सदर कांदळवन क्षेत्राचे हस्तांतरण करण्यात आले. या आधीच्या पहिल्या टप्प्यात सिडकोने आपल्या अधिकारक्षेत्रातील 281.77 हेक्टर कांदळवन क्षेत्राचे वन विभागाला हस्तातंरण केले आहे. कांदळवनांचे पर्यावरणाच्या दृष्टीने असलेले महत्त्व लक्षात घेऊन, कांदळवनांचे “राखीव वने” म्हणून संरक्षण व्हावे, या उद्देशाने सिडकोकडून कांदळवनांचे हस्तातंरण करण्यात आले आहे.

या प्रसंगी श्री. कैलास शिंदे, सहव्यवस्थापकीय संचालक सिडको, श्री. रविकुमार, मुख्य नियोजनकार (बांधकाम परवाना), श्री. सतिशकुमार खडके, अपर जिल्हाधिकारी तथा मुख्य भूमी व भूमापन अधिकारी (भूसंपादन) आणि सिडकोतील अन्य अधिकारी त्याचप्रमाणे कांदळवन कक्ष, मुंबई यांच्यातर्फे श्री. डी. एस. कुकडे, वनक्षेत्रपाल, नवी मुंबईदेखील उपस्थित होते.

मुंबई महानगर प्रदेशातील कांदळवनांचे संरक्षण आणि जतन व्हावे याकरिता संबंधित शासन संस्था व प्राधिकरणांकडून आपल्या अधिकारक्षेत्रातील कांदळवन क्षेत्रांचे हस्तांतरण वन विभागाच्या कांदळवन कक्षाकडे करण्यात येत आहे. सिडकोतर्फे यापूर्वी पहिल्या टप्प्यात पनवेल तालुक्यातील कामोठे येथील 134 हेक्टर, पनवेल येथील 38 हेक्टर व कोल्हे-खार येथील 109 हेक्टर, अशा एकूण 281.77 हेक्टर कांदळवन क्षेत्राचे ऑगस्ट 2021 मध्ये वन विभागाकडे हस्तांतरण करण्यात आले होते. दुसऱ्या टप्प्यात सिडकोकडून पनवेल तालुक्यातील उलवे येथील 24.20 हेक्टर, वहाळमधील 3.15 हेक्टर, वाघिवलीतील 39.94 हेक्टर आणि सोनखारमधील 0.75 हेक्टर, अशा एकूण 68.4 हेक्टर कांदळवन क्षेत्राचे हस्तातंरण वन विभागाला करण्यात आले. त्याचप्रमाणे सिडकोने कांदळवन कक्षाच्या सहाय्याने 370 हेक्‍टरवर खारफुटीची लागवड केली आहे. याचबरोबर मॅन्ग्रोव्ह इंटरप्रिटेशन सेलदेखील ऐरोली येथे आहे.

जमिनीची धूप होण्यापासून वाचवण्यासह पुराचे पाणी व वादळाला अटकाव करण्यामध्ये कांदळवने महत्त्वाची भूमिका बजावतात. तसेच अनेक पशू-पक्षी व जलचरांचा कांदळवनांमध्ये अधिवास असतो. हे लक्षात घेऊन कांदळवनांना पुरेसे वैधानिक संरक्षण प्राप्त व्हावे म्हणून कांदळवन क्षेत्र अधिसूचित करून, सिडकोकडून उपरोक्त कांदळवन क्षेत्राचा ताबा कांदळवन कक्षाला देण्यात आला.

सिडकोपर्यावरणाचेजतनवशाश्वतविकासकरण्यासाठीनेहमीचकटीबद्धआहे. नवीमुंबईचेनियोजनकरताना, सिडकोनेउद्यान, क्रीडांगणेआणिएनडीझेडसह (Non Development Zone) सुमारे 40% क्षेत्रहरितक्षेत्रासाठीठेवलेहोते. महाराष्ट्रशासनाच्यामार्गदर्शनाखालीआत्तापर्यंतसिडकोनेअंदाजे२०००हेक्टरजमीनवनविभागालासुपूर्दकेलीआहे. त्यामुळेकांदळवनांच्याजमिनींचेएवढेमोठेक्षेत्रहस्तांतरणकरणारीसिडकोहीएकमेवसार्वजनिकक्षेत्रातीलएकमेवसरकारीसंस्थाआहे.

डॉ. संजयमुखर्जी
उपाध्यक्षतथाव्यवस्थापकीयसंचालक, सिडको


Exit mobile version