एपीआय प्रशांत काळे यांची बदली

| माथेरान | वार्ताहर |
माथेरानमध्ये अल्पावधीतच आपल्या कार्याचा वेगळाच ठसा उमटवत सर्वसामान्य लोकांशी जिव्हाळयाचे संबंध प्रस्थापित करणारे, माथेरान पोलीस ठाण्याचे एपीआय प्रशांत काळे यांची पेण येथे बदली झाली आहे. यानिमित्ताने त्यांना निरोप देण्यासाठी माथेरान येथील राम मंदिर चौकात सर्व पक्षीय व सामाजिक कार्यकर्ते, व्यापारी वर्ग तसेच कष्टकरी श्रमिक मंडळी, नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते. याप्रसंगी प्रशांत काळे यांच्या कार्यकाळात त्यांना आलेला अनुभव सांगताना जड अंतकरणाने त्यांना निरोप दिला. माथेरान येथे आपल्या अडीच वर्षे कारकिर्दीत आपली वेगळी ओळख निर्माण करून फक्त पोलिसी कर्तव्य न करता खाकी वर्दीतील माणूसकीचे दर्शन माथेरानकरांनी प्रथमच अनुभवले आहे. प्रत्येकाला नावाने ओळखणारे हे पहिलेच अधिकारी आहेत.

Exit mobile version