एस व्ही निकम नवे तुरुंगाधिकारी
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
अलिबाग येथील जिल्हा कारागृहातील तुरुंगाधिकारी ए बी पालवे यांची ठाणे मध्यवर्ती कारागृह येथे बदली करण्यात आली असून त्यांच्या जागी परभणी जिल्हा कारागृहाचे तुरंगाधिकारी एस व्ही निकम यांची नियुक्ती करण्यात आली आहे. गृह विभागाच्या कारागृह व सुधारसेवा विभागाच्यावतीने राज्यातील अनेक तुरुंगाधिकार्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.
गेल्या काही महिन्यांपासून अलिबाग येथील जिल्हा कारागृह अनेक घटनांमुळे चर्चेत आले होते. पत्रकार अर्णव गोस्वामी यांच्यावरील खटल्याप्रकरणी हे कारागृह चांगलेच चर्चेत आले होते. नोव्हेेंबर 2020 मध्ये पोलिस कोठडीत असलेल्या अर्णव गोस्वामी यांना मोबाईल पुरविल्याच्या आरोपावरुन तत्कालिन तुरुंगाधिकारी ए टी पाटील यांच्यासह दोन कर्मचार्यांना निलंबित करण्यात आले होते. तर 23 जुन 2021 मध्ये कारागृहातील वर्ग दोनच्या महिला तुरुंगाधिकारी सुवर्णा चोरगे यांना कैद्याला सामान देण्याासाठी लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले होते. त्यानंतर पुढच्याच महिन्यात 21 जुलै रोजी बलात्काराच्या आरोपात कोठडीत असलेल्या आरोपीने विलगीकरण कक्षातून पलायन केले होते.