वन विभागाकडून आधुनिक सापळा हस्तांतरण

| पाताळगंगा | प्रतिनिधी |

खालापूर तालुक्यात वन्यजीव आणि मानव यांच्यातील संघर्ष कमी करण्यासाठी वन विभागाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. तालुक्यात वाढता वन्यजीवांचा वावर, अपघातांची शक्यता आणि जखमी प्राण्यांच्या उपचारासाठी आवश्यक सुविधा लक्षात घेता, वन विभागाने हेल्प फाऊंडेशन आणि आहिल फेन्सिंग अँड गॅबियन कंपनीच्या सहकार्याने एक अत्याधुनिक सापळा (पिंजरा) तयार करून घेतला आहे. यावेळी वन अधिकारी राजेंद्र पवार यांनी या उपक्रमाचे कौतुक करत, लोकसहभागातूनच वन, वनसंपदा आणि वन्यजीवांचे संरक्षण शक्य असल्याचा विश्वास व्यक्त केला. तर, वनपाल भगवान दळवी यांनी या उपक्रमात विशेष भूमिका बजावली. यावेळी वनरक्षक घुटे, चंदन नागरगोजे, गायकवाड, काटकर, सागर टोकरे कोळी, मयूर निकम, धनाजी, सावंत तसेच वनपाल नितीन कांबळे यांच्यासह खोपोलीचे माजी नगरसेवक किशोर पानसरे, हेल्प फाऊंडेशनचे गुरुनाथ साठेलकर, हनीफ कर्जीकर, अमोल कदम, अमोल ठकेकर, प्रवीण शेंद्रे, आकाश सताने, सरफराज पटेल, दिनेश पाटील यांच्यासह प्राणीमित्र उपस्थित होते.

Exit mobile version