। नेरळ । वार्ताहर ।
उमरोली ग्रामपंचायत मधील आषाणे गावातील विद्युत रोहित्र पूर्ण मोडकळीस आलेले होते. अखेर उमरोली परिसरातील मनसेच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत महावितरणकडून निकामी झालेले विद्युत रोहित्र शुक्रवारी (दि.24) बदलण्यात आले.
यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेना शाखेच्या वतीने महावितरणचे देवके, वायरमन कैलास कुंभारकर यांचे आभार व्यक्त करण्यात आले. याप्रसंगी मनसेचे उमरोली वॉर्ड उपविभाग अध्यक्ष मनोज ठाणगे, आषाणे मनसे अध्यक्ष शाखा अध्यक्ष आशिष ठाणगे, रोशन जाधव, अशोक कर्णुक, प्रशांत ठाणगे, अमर ठाणगे, सिद्धार्थ ठाणगे, जितेंद्र रूठे, ओमकार घारे,पंकज बुंधाटे आदी उपस्थित होते.