। रसायनी। वार्ताहर ।
जिल्ह्यातील अनेक ठिकाणी पोलीस भरती परीक्षा सुरू असून रसायनीतील पिल्लई एचओसी इंटरनॅशनल स्कूलमध्ये रसायनी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कैलास डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्तात पोलीस भरती लेखी परीक्षा सुरू आहे. परिक्षेच्या एक दिवस अगोदरपासूनच पिल्लई परिसरात चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.यावेळी मुंबई पुणे जुन्या महामार्गावरील दांडफाटा येथे बाहेरगावाहून आलेल्या परिक्षार्थीसाठी तीन आसनी रिक्षातून मोफत प्रवासाची सोय रसायनी पोलिसांनी केली होती. तर राज्यातील विविध भागातून एक दिवस अगोदर आलेल्या परिक्षार्थीसाठी मोहोपाडा जनता विद्यालयात राहण्याची व्यवस्था करण्यात आली होती.त्यांच्या जेवनापासून नाश्ता,चहा पाण्याची व्यवस्था रसायनी पोलिस ठाण्याकडून मोफत करण्यात आली होती.