| पनवेल | प्रतिनिधी |
ट्रॅव्हल बस आणि थार गाडीचा अपघात झाला. या अपघातात बसमधील चालक आणि प्रवासी जखमी झाले. या अपघाताप्रकरणी थार गाडीवरील चालकाविरोधात पनवेल तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
अजय गणपत वाडकर हे जोगेश्वरी येथे राहत असून, ते ट्रॅव्हल्स बसने प्रवासी घेऊन महाबळेश्वर ते मुंबई असे येत होते. दरम्यान, पुणे-मुंबई महामार्गावरील अजिवली येथील एचएसपी ट्रॅफिक पोलीस चौकीजवळ बस घेऊन आले असता, एका थार गाडीचालकाने पनवेल एक्झिट नो एन्ट्रीमार्गे रस्त्याच्या विरुद्ध दिशेने गाडी चालवली. धोकादायक स्थितीत महामार्गार वळण घेऊन मुंबई दिशेकडे जात असताना अचानकपणे ट्रॅव्हल्स बसच्या समोर आला आणि अपघात झाला. या अपघातात अजय वाडकर आणि काही प्रवाशांना किरकोळ दुखापती झाल्या आहेत. या अपघातात दोन्ही गाड्यांचे नुकसान झाले आहे. याप्रकरणी पनवेल तालुका पोलीस अधिक तपास करत आहेत.







