‘या’ महामार्गावर प्रवास करणं ठरतंय धोकादायक

समृद्धी महार्गावर 11 महिन्यात 1040 अपघातात 132 जणांचा मृत्यू
| मुंबई | प्रतिनिधी |
समृद्धी महामार्गावर 11 डिसेंबर ते 31 ऑक्टोबर 2023 या 11 महिन्याच्या कालावधीत एकूण 1,040 अपघातांची नोंद झाली. पैकी 64 अपघातामध्ये 132 नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे.

महामार्गावर नागपूर विभागात 656 अपघातांमध्ये 80 मृत्यूची नोंद झाली आहे. ज्यामध्ये खुर्सापूरमध्ये 55 अपघात, जाम येथे 117 अपघातात 15 मृत्यू, धामणगाव रेल्वे येथे 131 अपघात 9 मृत्यू, आमनी 216 अपघातात 10 मृत्यू, मलकापूरमध्ये 137 अपघातांमध्ये सर्वाधिक 46 मृत्यू झाले आहेत. औरंगाबाद 215 अपघातात 24 जणांचा मृत्यू झाला आहे, तर जालना 117 अपघात 12 मृत्यू, भाबलेश्वर 22 अपघात 9 मृत्यू, घोटी 4 अपघात, सिन्नर 25 अपघात 7 मृत्यू, असे एकूण 1040 अपघातांमध्ये 132 मृत्यूची नोंद झाल्याची माहिती महामार्ग पोलिसांनी दिली.

Exit mobile version