| नेरळ | प्रतिनिधी |
नेरळ गावातील मोहाचीवाडी ग्रामस्थ मंडळ यांच्या माध्यमातून बॉक्स क्रिकेटची स्पर्धा आयोजित केली होती. नेरळ गावातील नामांकित 20 संघांचा सहभाग असलेली यंगस्टार चॅम्पियन ट्रॉफी नेरळ गावातील टेपआळीमधील ट्रॅव्हल्स पॉईंट संघाने जिंकली.
मोहाचीवाडी ग्रामस्थ मंडळाने नेरळ गावातील छत्रपती शिवाजी महाराज मैदान येथे बॉक्स क्रिकेटचे आयोजन केले होते. या यंगस्टार चॅम्पियन ट्रॉफी मध्ये नेरळ ग्रामपंचायत हद्दीतील 20 संघांनी सहभाग घेतला होता. दोन दिवस या बॉक्स क्रिकेट स्पर्धा रात्रीच्या वेळी खेळविण्यात आल्या. या स्पर्धेचे मुख्य आयोजन रोहन चव्हाण आणि मुकेश गायकवाड यांनी केले होते. तर मोहाची वाडी ग्रामस्थ मंडळाने सामन्यांचे व्यवस्थापन केले. त्यात हेमंत चव्हाण, अक्षय चव्हाण, धनाजी डबरे, सज्जद खान, इम्रान खान, रोशन आढाव, राहत अली खान आणि ग्रामस्थ यांचा सहभाग होता. स्पर्धेला सर्व राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी भेट दिली. मध्यरात्री दीड वाजता स्पर्धेचा अंतिम सामना रंगला आणि त्यात ट्रॅव्हल्स पॉईंट टेपआळी संघाने जयदीप मंडळ नेरळ पूर्व संघाचा अटीतटीच्या लढतीत पराभव केला आणि विजेतेपद पटकावले. तिसरा क्रमांक कुंभार आळीमधील विजयगर्जना संघाने तर केसीसी संघ चौथ्या क्रमांकावर राहिला.







