फिरत्या दवाखान्यामुळे रुग्णांवर उपचार

| सुकेळी । वार्ताहर ।
ऐनघर ग्रामपंचायत हद्दीमध्ये कार्यरत असलेल्या बी.सी.जिंदाल चॅरिटेबल ट्रस्ट हॉस्पिटल यांच्यातर्फे जवळ- जवळ 12 ते 15 वर्षांपासून जिंदालच्या फिरत्या दवाखान्यामार्फंत आजुबाजूच्या विभागात गावोगावी जाऊन गोरगरीब रुग्णांची तपासणी केली जाते. तसेच मोफत औषधे देण्याचे काम जिंदालच्या या फिरत्या दवाखान्यामार्फंत सुरू आहे. त्यामुळे या कार्याचे सर्वत्र कौतुक होतांना दिसत आहे. विभागातील जनतेचे आरोग्य उत्तम रहावे याकरिता जिंदाल कंपनीचे चेअरमन डी. पी.जिंदाल यांच्या प्रयत्नांतून बी. सी. जिंदाल हॉस्पिटलमार्फंत फिरता दवाखाना सुरु करण्यात आला आहे.

या फिरत्या दवाखान्यामध्ये ताप, सर्दी, खोकला, गुडघेदुखी, सांधेदुखी तसेच विविंध आजारांवरती डॉक्टरांकडुन तपासणी करून मोफत औषधे दिली जातात. हा दवाखाना ऐनघर ग्रामपंचायत हद्दीमधिल ऐनघर, सुकेळी, खैरवाडी, मांडवशेत, वेताळवाडी, बाळसई , हेदवली, तामसोली, गणपतवाडी, धनगरवाडा आदि गावांसह पाटणसई ग्रामपंचायतीमध्ये पाटणसई आदिवासीवाडी, वज्रोली, गोडसई, खांब विभागामध्ये ऐनवहाळ, डोलवहाळ, घेरासुरगड, वैजनाथ, मुठवळी, चिल्हे, नडवळी, तळवळी तसेच पाली विभागामध्ये बलाप व राबगाववाडी येथिल रुग्ण या सेवेचा लाभ घेत आहेत.

Exit mobile version