नेरळ विद्या भवन शाळेत वृक्षारोपण

| नेरळ | प्रतिनिधी |

धामोते येथील नेरळ विद्या भवन माध्यमिक विद्यालय शाळेच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त जगदगुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी महाराज भक्त सेवा मंडळ मुंबई शहर (अ) यांच्या वतीने शैक्षणिक उपक्रम राबविला. या उपक्रमांतर्गत पर्यावरण रक्षणासाठी बहुगुणी वनौषधी कडुनिंब, जांभूळ, वड, पिंपळ यांसारख्या मानवी जीवनात ऑक्सिजनचे अनन्यसाधारण महत्त्व असणाऱ्या विविध फळाफूलांचे 50 रोपांची लागवड शाळेच्या निसर्गरम्य वातावरणात करण्यात आली.

नेरळ विद्या भवनमध्ये आयोजित कार्यक्रमात जगदगुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी महाराज भक्त सेवा मंडळ मुंबई शहर यांचे मुख्य संयोजक विनय पडवळ, मुंबई शहर(अ) तालुका प्रमुख, बेस्ट उपक्रमातील निवृत्त अधिकारी, लालबाग सेवा केंद्राध्यक्ष श्रीकांत विश्वनाथ खामकर यांच्या संकल्पनेतून 14 स्वयंसेवकांच्या उपस्थितीत करण्यात आले. इयत्ता पाचवी ते दहावीच्या वर्गातील पाच विद्यार्थ्यांच्या गटात प्रत्येकी एक झाड जोपासण्यासाठी गट विभागणी करून वृक्ष संगोपन आणि वृक्षसंपदा संवर्धन करण्यासाठी शपथ देण्यात आली. शाळेच्या सहायक शिक्षिका पुष्पा सोनवणे यांनी रोपटयांचे हळदीकुंकू औक्षणाद्वारे विधिवत पूजन केले. विद्यार्थ्यांनी ढोल ताशा लेझीम पथकाच्या गजरात निसर्ग आमचा सोबती जयघोष करीत वृक्षदिंडी काढली. हे या कार्यक्रमाचे खास वैशिष्ट्य ठरले.

Exit mobile version