| रेवदंडा | वार्ताहर |
महाराष्ट्र दिन व कामगार दिनाचे औचित्याने रेवदंडा पोलीस ठाण्यात वृक्षारोपण कार्यक्रम घेण्यात आला. रेवदंडा पोलीस ठाण्याचे पोलिस निरिक्षक देविदास मुपडे यांचे प्रमुख उपस्थितीत वृक्षारोपण करण्यात आले. या वृक्षारोपण कार्यक्रमांस रेवदंडा पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरिक्षक माळी, नौका विभाग पोलिस उपनिरिक्षक भोईर, नौका विभाग पोलिस उपनिरिक्षक कुंटे, सहा. फौजदार अशोक पाटील, सहा. फौजदार देसाई, पोलिस हवालदार पिंपळे, आणि पोलिस कर्मचारी भोईर, वाघमारे, मेहत्तर, जाधव, नांदगावकर, बारगुंडे, दुम्हारे, तसेच सेवानिवृत्त पोलिस झावरे, झुरे आदी उपस्थित होते.