सहाणगोठी येथे वृक्षारोपण

| अलिबाग | वार्ताहर |
टीचर फाऊंडेशन अलिबागच्या वतीने शनिवार, दि. 23 जुलै रोजी सहाणगोठी येथील आदिवासीवाडी प्राथमिक शाळा वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमाप्रसंगी डॉ.अक्षय कोळी (डेंटल स्पेशालिस्ट) व इतर फाऊंडेशनचे पदाधिकारी उपस्थित होते. आज खर्‍या अर्थाने झाडांचे संवर्धन करणे ही काळाची गरज आहे. त्यामुळे फक्त झाडे लावून उपयोगाचे नाही, तर ती जगवली पण पाहिजेत, असे मत डॉ. अक्षय कोळी यांनी व्यक्त केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी टीचर फाऊंडेशनचे अध्यक्ष संजय पोईलकर व त्यांच्या सहकार्‍यांनी मेहनत घेतली.

Exit mobile version