| अलिबाग | वार्ताहर |
1 जुलै कृषी दिनाचे औचित्य साधून रायगड फोटोग्राफर आणि व्हिडिओग्राफर असोसिएशनच्या आवाहनानुसार जिल्हास्तरीय वृक्षारोपण कार्यक्रम करण्याचे आयोजन केले होते. त्यानुसार अलिबाग फोटोग्राफर असोसिएशनतर्फे खंडाळे ग्रामपंचायत हद्दीतील सागाव क्रिकेट मैदान परिसरात वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी चिकू, पेरू, सीताफळ, काजू अशा प्रकारच्या 55 फळ झाडांच्या रोपांची लागवड करण्यात आली. यावेळी खंडाळे ग्रामपंचायत सदस्य, रायगड फोटोग्राफर अँड व्हिडिओग्राफर्स असोसिएशन खजिनदार जितेंद्र मेहता, अलिबाग फोटोग्राफर्स असोसिएशनचे अध्यक्ष तुषार थळे, सचिव विकास पाटील, खजिनदार विवेक पाटील, सह कार्याध्यक्ष सुबोध घरत, सल्लागार सुरेश खडपे, सचिन आसराणी, विजय पाटील, गणेश जाधव, वैभव शिंदे, योगेश सावंत, निलेश दुदम, अमर मढवी, दिलीप राजभर, दीपेश पाटील, सात्विक पाटील, खंडाळा ग्रामपंचायत सदस्य रुचिता भगत, प्रणय भगत, दीनानाथ पाटील, दीपक पाटील, अनिश पाटील, प्रशांत म्हात्रे, अमोल गायकवाड, रितेश ठाकूर, मयुरेश भगत, बंड्या पाटील, आज्ञा पाटील आदी उपस्थित होते.







