माजगाव ग्रामपंचायतीकडून वृक्षारापेण

| पाताळगंगा | वार्ताहर |

माजगाव ग्रामपंचायतीच्या माध्यमातून पेरु, आवळा, साग, बदाम अशा 1090 वृक्षांची लागवड करण्यात आली. यासाठी ग्रामपंचायतीच्या परिसरातील असलेली स्मशानभूमी, माळरान, रस्त्याच्या दुर्तफा, शाळा परिसर येथे वृक्षलागवड करण्यात आली.

ग्रुप ग्रामपंचायत माजगाव या परिसरात माजगाव, वारद, पौध तसेच अदिवासीवाड्या अशा विविध ठिकाणी या वृक्षांचे लागवड करण्यात आली. यावेळी माजगाव सरपंच दिपाली पाटील, ग्रामसेवक संदीप धारणे, मा. उपसरपंच राजेश पाटील, सदस्या प्रांजळ जाधव, पूनम जाधव, सरिता वाघे, अर्पणा शिंदे, वैशाली महाब्दी, वंदना महाब्दी, शशिकांत पाटील, मधुकर गायकवाड, को.ऐ.सो. माध्यमिक शाळा माजगाव मुख्याध्यापक गौतम कांबळे, नरेश पाटील, सूर्याजी पाटील तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.

Exit mobile version