नेने महाविद्यालयात वृक्षारोपण कार्यक्रम

| पेण | वार्ताहर |

पेणच्या भाऊसाहेब नेने महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना युनिटतर्फे कॉलेजच्या क्रीडांगणाच्या परिसरात शनिवारी (दि. 20) वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न झाला.
या कार्यक्रमाचे उद्घाटन कॉलेजच्या प्रभारी प्राचार्या मेनन मॅडम यांनी केले. या कार्यक्रमाला मार्गदर्शन राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे मुख्य कार्यक्रम अधिकारी प्राध्यापक डॉ. तुकाराम माळवे, कार्यक्रम समन्वयक प्राध्यापक डॉ. सुभाष लकडे तसेच वनस्पतीशास्त्र विभागाच्या प्राध्यापिका व कार्यक्रम समन्वयक महिला कार्यक्रम अधिकारी सायली पितळे आणि वैदेही जोशी यांनी केले.

याप्रसंगी भाऊसाहेब नेने महाविद्यालयाच्या क्रीडांगणाच्या परिसरात विविध प्रकारची फळझाडे तसेच इतर वृक्ष लावण्यात आले. याप्रसंगी विद्यार्थ्यांना पर्यावरण समतोल, तसेच वृक्षारोपण व संवर्धन याबद्दल मार्गदर्शन करण्यात आले.

राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी पर्यावरण संवर्धन व सामाजिक बांधिलकी जपत हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडला. याप्रसंगी राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Exit mobile version