उडदवणेत वृक्षारोपण कार्यक्रम

| खांब | वार्ताहर |

वृक्षारोपण ही काळाची गरज ओळखून श्री काळभैरव मित्र मंडळ उडदवणे यांच्या व तरूण मंडळ यांच्यावतीने वृक्षारोपणाचा कार्यक्रम संपन्न करण्यात आला. काळभैरव मित्र मंडळ उडदवणेचे सर्व पदाधिकारी व सदस्य यांच्यासह या उपक्रमाला महेश तुपकर, घनश्याम कराळे, मारुती तुपकर, उपसरपंच निलेश मालुसरे, सदस्य योगेश शिंदे, सदस्य कुमार कोल्हटकर, नरेश गायकर, दिगंबर कांबळे, करण कराळे, उडदवणे गावातील युवती वर्ग तसेच, ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.

Exit mobile version