चित्रलेखा पाटील यांच्या हस्ते वृक्ष लागवड

स्व. जितेंद्र वामन पाटील यांच्या जयंतीनिमित्त आयोजन
अलिबाग । शहर प्रतिनिधी ।
पनवेल तालुक्यातील नेरे येथील स्व. जितेंद्र वामन पाटील यांच्या जयंतीनिमित्त शुक्रवारी (दि.18) मित्र मंडळाच्या वतीने नेरे येथे त्यांना आदरांजली वाहण्यात आली. यावेळी शेकाप जिल्हा महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत वृक्ष लागवड करण्यात आली. याप्रसंगी काशिनाथ पाटील, विलास फडके, गणेश कडू, राजेश केणी, देवा पाटील आदी शेकापचे पदाधिकारी तसेच कार्यकार्ये उपस्थित होते.

Exit mobile version