| कोर्लई | प्रतिनिधी |
मुरुड-साळाव रस्त्यालगत मोठ्या प्रमाणावर झाडेझुडपे वाढली आहेत. अनेक ठिकाणच्या वळणांवर असलेल्या झाडाझुडुपांमुळे वेळप्रसंगी अपघाताला सामोरे जावे लागत आहे. मुरुडमधील परेश नाका ते राजवाडा विहूर दरम्यानच्या वळणावर असलेल्या झाडाझुडपांमुळे समोरून येणारे वाहन दिसत नाही. त्यामुळे वेळप्रसंगी याठिकाणी अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. नुकताच याठिकाणी पीकप टेम्पो व एसटीबसचा भीषण अपघात होऊन तेरा जण जखमी झाले आहेत. त्यामुळे संबंधित बांधकाम खात्याने यात तातडीने दखल घेऊन योग्य ती उपाययोजना करण्याची मागणी पर्यटक, प्रवासी व नागरिकांतून केली जात आहे.
रस्त्यालगतची झाडेझुडपे अपघाताला आमंत्रण
