मुसळधार पावसामुळे वेणगाव येथे झाडे कोसळली

| वेणगाव | प्रतिनिधी |

सतत पडत असणाऱ्या वादळी वाऱ्यासह  मुसळधार पावसात कर्जत तालुक्यातील मोठे वेणगाव येथे  25 व 26 जुलैच्या रात्री दोन झाडे कोसळली आहेत, सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही, येथील विनय पेठे यांचे नारळाचे झाड बाजूला शेजारी असणारे पंकज गोरे यांच्या घरावरती 26 जुलैच्या रात्री पावसामध्ये पडले, या घटनेत पंकज गोरे यांच्या घराची थोडेफार प्रमाणात नुकसान झाली असून कोणतीही प्रकारची जिवीत हानी झालेली नाही.   

तसेच वेणगाव येथीलच राम गवळे यांच्या घराशेजारी असणारा परसातील एक भले मोठे सागाचे झाड 25 जुलैच्या मध्यरात्री पावसात पडले, दुर्दैवाने घराच्या विरुध्द दिशेला पडल्याने कोणतीही जीवित हानी झाली नाही. 

Exit mobile version