विकटगड येथील ट्रेकर्स कोसळला दरीत

रेस्न्यू टीमने सुखरूप बाहेर काढले

| नेरळ | प्रतिनिधी |

माथेरान डोंगरातील शिवकालीन विकटगड येथे ट्रेकिंगसाठी गेलेल्या पर्यटकांमधील एक महिला पर्यटक दरीमध्ये कोसळली. माथेरानमधील रेस्न्यू टीमने त्या 16 वर्षीय रिया साबळे पाय घसरून 200 फूट दरीत कोसळलेल्या ट्रेकर्सला जखमी अवस्थेत सुखरूप बाहेर काढले आहे.

विकटगड येथे ट्रेकिंगसाठी पर्यटक येत असतात. रविवारी ट्रेकिंगसाठी मोठ्या प्रमाणात ग्रुप आले होते. माथेरान येथे पेब किल्ला येथे खूप मोठ्या प्रमाणात पर्यटक ट्रेकिंगसाठी जात असतात. ट्रेकिंगसाठी आलेल्या पर्यटकांच्या ग्रुपमधील मुंबई अंधेरी येथील 16 वर्षीय रिया साबळे ही ट्रेकर्स आपल्या मित्रांसह विकटगड येथील विविध भागात पर्यटन करीत होते.दुपारी पुन्हा घरी परतण्यासाठी निघालेले ट्रेकर्स पायवाटेने गड उतरण्याच्या तयारीत असताना रियाचा पाय घसरला आणि ती साधारण 200 फूट खोल दरीत कोसळली. सोबत असलेल्या मित्रांनी मदतीसाठी धावाधाव सुरू केली. रियाला रेसक्यू करण्यासाठी माथेरान येथील रेस्न्यू टीम घटनास्थळी पोहोचली. या टीमचे वैभव नाईक, सुनील ढोले, सुनील कोळी, महेश काळे, चेतन कोळंबे, तसेच नेरळ पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक शिवाजी ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक अमोल साळुंखे यांच्यासह बचावकार्यात सहभाग घेतला. रियाला दरीतून बाहेर काढण्यात आल्यानंतर ती गंभीर जखमी असल्याचे दिसून आले.तिच्या डोक्यावर गंभीर दुखापत झाली होती. तिला तात्काळ डिकसळ येथील रायगड हॉस्पिटल येथे हलवण्यात आले आहे असून, सध्या उपचार सुरू आहेत.

Exit mobile version