चित्रलेखा पाटील यांचा पुढाकार; नगरसेवक संतोष जंगम यांचा पाठपुरावा
| खोपोली | प्रतिनिधी |
खालापूर नगरपंचायत हद्दीतील आदिवासी बांधव आजही कुडा-मातीच्या घरात राहत आहेत. पावसाळ्यात आपला निवारा टिकविण्यासाठी त्यांना मोठी कसरत करावी लागते. ही समस्या लक्षात घेऊन स्थानिक नगरसेवक संतोष जंगम आणि माजी नगराध्यक्षा शिवानी जंगम यांनी शेकापक्षाच्या महाराष्ट्र प्रवक्त्या चित्रलेखा पाटील यांचाकडे मागणी केली. त्यांच्याकडून सीएसआर फंडातून प्राथमिक स्वरूपात शिरवलीवाडीतील 7 आदिवासी बांधवांना पक्की घरे बांधून दिली जाणार आहेत.
शेतकरी कामगार पक्षाचे कर्जत-खालापूर विधानसभा अध्यक्ष संतोष जंगम हे दांडवाडी, शिरवलीवाडीतील प्रभागातून नगरसेगवक म्हणून निवडणून आले आहेत. त्यांनी आदिवासी भागत काँक्रीट रस्ते, पाणी, वीज अशा मूलभूत सुविधा पोहोचवून आदिवासी वाड्यांचा कायापालट केली आहे. परंतु, आजही आदिवासी बांधव कुडा मातीच्या घरात राहत आहेत. त्यांना पक्के घरे बांधली पाहिजे, असे स्वप्न संतोष जंगम आणि माजी नगराध्यक्षा शिवानी जंगम यांचे आहे. त्यासाठी शेकापच्या राज्य प्रवक्त्या चित्रलेखा पाटील यांची मदत घेत सीएसआर फंडातून आदिवासी बांधवांना पक्की घरे बांधण्यात येणार आहेत. त्यातील पहिले 2015 फुटाचे स्लँबचे घर मठवाडी येथे बांधण्यात आले आहे. त्याचप्रकारे इतर सात घरे शिवलीवाडीत बांधण्यात येणार आहेत. त्यामुळे आदीवासी बांधवांनी संतोष जंगम यांच्यासह शेतकरी कामगार पक्षाचे आभार व्यक्त केले आहेत.
नगराध्यक्ष रोशना मोडवे यांच्या हस्ते शनिवारी (दि.7) भूमिपूजन करून कामाचा शुभारंभ करण्यात आला आहे. यावेळी घरांच्या भूमिपूजनासाठी नगराध्यक्ष रोशना मोडवे, उपनगराध्यक्ष किशोर पवार, माजी नगराध्यक्षा शिवानी जंगम, माजी उपनगराध्यक्ष तथा स्थानिक नगरसेवक संतोष जंगम, नगरसेवक सचिन कांबळे, दिनेश फराळ, निशान पानपाटील, पांडुरंग मगर, नगरसेविका ममता चौधरी, ऋषिकेश चालके आणि स्थानिक आदिवासी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आदिवासी समाज नेहमीच आमच्या पाठीशी खंबीरपणे उभा असतो, म्हणूनच त्यांना मूळ समाजाच्या प्रवाहात आणणे हे आमचं मुख्य कर्तव्य आहे. शेकापच्या राज्य प्रवक्त्या चित्रलेखा पाटील यांच्या पुढाकारातून मठवाडीत एक प्रयोगिक तत्वावर घर बांधले आहे. तशीच सात घरे बांधून देण्यासाठी शुभारंभ केला आहे. ही चांगल्या दर्जाची स्लँबची घरे आहेत. त्यामध्ये शौचालय, हॉल, स्वतंत्र स्वयंपाकघर असणार आहे. हे घर तयार झाल्यावर आदिवासी बांधवांचा आनंद पाहून खऱ्या अर्थाने मानसिक समाधान प्राप्त होणार आहे.
– शिवानी जंगम, माजी नगराध्यक्षा, खालापूर







