। नेरळ । प्रतिनिधी ।
कडाव येथील एका आदिवासी महिलेला बँकेच्या एजंट महिलेच्या पती आणि दोन दिरांकडून मारहाण करण्याची घटना कर्जत तालुक्यात घडली. या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
संगीता वाघे यांचा महिला आदिवासी बचत गट असून या बचत गट महिलांनी बँकेकडून कर्जस्वरूपात काही रक्कम घेतली. शिवाय या बँकेचे हप्ते या महिला बचत गटाकडून कडाव येथील राहणार्या बँक एजंट महिला वसूल करीत असतात.
या आदिवासी महिला बचत गटाकडून हप्ते भरलेले असूनही एक हप्ता भरलेला दिसून न आल्याने संगीता वाघे या हेमा पवाली यांच्या कार्यालयात चौकशीसाठी गेल्या असता एजंट महिलेच्या पतीने व तिच्या दिरांनी शिवीगाळ करीत मारहाण केली,असे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.