आदिवासी तरुणांनी व्यवसाय करावेत

। नेरळ । वार्ताहर ।

आदिवासी समाजातील तरुण नोकर्‍या शोधण्याची धडपड करीत असतात. मात्र, कर्जत तालुक्यात आदिवासी समाजातील तरुण नोकर्‍यांबरोबर व्यवसाय करण्यासाठी पुढे येत आहेत. ही समाजासाठी निश्‍चित अभिमानास्पद बाब असल्याचे मत कर्जत तालुका आदिवासी संघटनेचे अध्यक्ष परशुराम दरवडा यांनी व्यक्त केले.

नेरळजवळील ढाकीचामाळ येथील आदिवासी तरुण संदीप चौधरी यांनी केश कर्तनालय सुरू केले. यावेळी परशुराम दरवडा, दत्तात्रेय सुपे, नितीन निरगुडा, दत्तात्रेय निरगुडा, हवालदार कुमरे, मनीषा रावजी शिंगवा, जयराम उघडा, जयवंत उघडा, मधुकर शिंगवा, विकास पारधी, गोमा निरगुडा, काशिनाथ निरगुडा, रामा ठोंबरे, बाळू पुंजारा, नामदेव चौधरी, तातू दरवडा आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना परशुराम दरवडा यांनी नेरळ येथे स्वतः चा व्यवसाय असावा या हेतूने आणि कर्जत तालुका आदिवासी समाज संघटनेच्या मार्गदर्शनाने व्यवसाय म्हणून केस कर्तनालयाचे दुकान सुरू झाले आहे. आदिवासी समाज हा विविध क्षेत्रात कला कौशल परिपूर्ण आहे. त्यामुळे आता आदिवासी समाज बांधवाने व्यवसायाकडे लक्ष केंद्रीत करावे, असे आवाहन परशुराम दरवडा यांनी केले.

Exit mobile version