। पनवेल । वार्ताहर ।
26 नोव्हेंबर 2008 रोजी मुंबईमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या बांधवांना पनवेल शहर वाहतूक शाखेच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली.
यावेळी वाहतूक शाखेचे पोलीस उपनिरीक्षक संजय कदम, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक, जाधव, आवारी, नागरगोजे, अलका पाटील, साधना पवार, वैशाली पवार, सविता कदम यांच्यासह टोईंग व्हॅन वरील सर्व कर्मचारी व पनवेल वाहतूक शाखेचे आदी पोलीस कर्मचारी उपस्थित होते.