| माथेरान | वार्ताहर |
माथेरानच्या आपदा मित्रांकडून आपत्ती व्यवस्थापन तसेच मदतीचा हात दिल्यामुळे आपदा मित्र दिनेश सुतार यांचा सन्मान नैसर्गिक आपत्ती निवारण दिनाचे औचित्य साधून करण्यात आला. खालापूरचे तहसीलदार यांच्या हस्ते हा सन्मान करण्यात आला.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 350 व्या शिवराज्याभिषेक सोहळ्यात किल्ले रायगड येथे स्वयंसेवक म्हणून अभूतपूर्व कामगिरी केल्यामुळे तसेच इर्शाळवाडीतील दुर्घटनेत आपत्ती व्यवस्थापनात तीन दिवस सतत मदत केल्यामुळे त्यांच्या कामाची प्रशासनाकडून दखल घेऊन माथेरान आपदा मित्र दिनेश सुतार यांचा सन्मान करण्यात आला. जागतिक स्तरावर नैसर्गिक आपत्ती निवारण दिनाचे औचित्य साधून खालापूरचे तहसीलदार आयुब तांबोळी यांच्या हस्ते त्यांच्या दालनात प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला.
यावेळी नायब तहसीलदार सुधाकर राठोड, खोपोली येथील आपद्ग्रस्तांच्या मदतीसाठी या संस्थेचे गुरुनाथ साठेलकर, विजय भोसले, अमोल कदम, विशाल चव्हाण, अमोल ठिकेकर आदी उपस्थित होते. महाडच्या तत्कालीन उपविभागीय अधिकारी प्रतिभा पुदलवाड यांच्या संकल्पनेतून हा सन्मान देण्यात आल्याचे सांगण्यात आले.