जिविता पाटील यांचा सत्कार

| भाकरवड । वार्ताहर ।

अलिबाग तालुक्यातील कुसुंबळे गावच्या सामाजिक कार्यकर्ते जीविता सूरज पाटील हिचा भारत सरकारने त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत भारत भूषण पुरस्काराने गौरविण्यात आले. याबद्दल दि 17 ऑगस्ट रोजी पेझारी आंबेपुर येथे सत्कार करण्यात आला.

हा सत्कार मनस्वी मानव सेवा भाकरवड, सेवा श्रम वाघ्रण, आणि नृत्यात रंगला महाराष्ट्र -नारंगी यांच्या संयुक्त विद्यमाने या सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.

जिविता या अंगणवाडी सेविका असून गरजू बालकांना मायेचा हात देणार्‍या सामाजिक कार्यकरत्या आहेत. ज्यांनी आपल्या उभ्या आयुष्यातील खडतर प्रवासात जनसेवेला प्राधान्य दिले आहे. अनेक आदिवासी दुर्गम भागात जाऊन तेथील विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण मार्गदर्शन केले. तर काही मुलं दत्तक घेऊन त्यांचा शैक्षणिक खर्च स्वतः उचलून त्यांना नव्या उमेदीने जगण्याची दिली आहे. अनाथ आश्रम, वृद्धाश्रम यांना वेळोवेळी आपल्या परीने आर्थिक मदत सुद्धा केली आहे. त्यांनी आत्ता पर्यंत 100 हुन अधिक तालुका स्तरीय, जिल्हा स्तरीय पुरस्कार प्राप्त केले आहेत. म्हणूर त्याचा हा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमास किशोर पाटील, रसिक म्हात्रे, जीवन पाटील, दीपक पाटील, अजित पाटील, रुपेश पाटील उपस्थित होते. तर सूत्रसंचालन दीपक पाटील यांनी केल.

Exit mobile version