महाडमध्ये कोएसोतर्फे स्व. दत्ता पाटील यांना अभिवादन

| महाड | प्रतिनिधी |

माजी विधानसभा विरोधी पक्षनेते, कोएसोचे अध्यक्ष स्व. दत्ता पाटील यांच्या जयंतीनिमित्त महाडच्या कोएसो दगडूशेठ पार्टे इंग्लिश मीडियम स्कूल येथे त्याचप्रमाणे वि.ह.परांजपे आणि वामन गोपाळ गाडगीळ या कोएसोच्या विद्या संकुलात या लोकनेत्याला विनम्र अभिवादन करण्यात आले.

इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थी विद्यार्थिनींनी मानवी साखळी करून इंग्रजी ‘दादा’ अक्षराची प्रतिकृती निर्माण केली होती आणि ते दृष्य खूपच मनमोहक व नेत्रदीपक असे होते. काही विद्यार्थ्यांनी दादांच्या जीवनावर भाषण करीत त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. साडेपाचशे विद्यार्थ्यांनी वृक्षारोपण देखील केले. महाड शहरातील काही सरकारी कार्यालयात विद्यार्थ्यांनी वृक्षांचे वाटप केले.

इंग्लिश मीडियम स्कूलच्या प्राचार्या वीणा मुखीया यांच्या मार्गदर्शनाखाली आणि कलाशिक्षक नवीन परमार यांच्या संकल्पनेतून सर्व शिक्षक वर्ग आणि विद्यार्थ्यांनी यासाठी विशेष मेहनत घेतली. त्याचप्रमाणे परांजपे विद्यालयाच्या श्रीमती शेठ श्रीमती मेहता, वामन गोपाळ गाडगीळच्या प्राजक्ता तेंडुलकर, श्रीमती कुंभार यांनी देखील शिक्षक व विद्यार्थ्यांसह आपापल्या विद्यासंकुलात हा जयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला.

Exit mobile version