। माणगाव । प्रतिनिधी ।
माणगाव येथील लोहित हार्डवेअरचे मालक तथा माणगाव व्यापारी असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मण दळवी यांचे पिताश्री सदाशिवराव महादेवराव दळवी यांचे बुधवारी (दि.22) पहाटे 4 वा. राहत्या घरी माणगाव येथे वृद्धापकाळाने निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय 90 वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात दोन मुले, तीन सुना, नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या निधनाने दळवी कुटुंबियांवर शोककळा पसरली आहे.