मीनाक्षी पाटील यांना पीएनपी संकुलात श्रद्धांजली

| अलिबाग | प्रतिनिधी |

पीएनपी एज्युकेशन सोसायटीच्या उपाध्यक्ष, माजी राज्यमंत्री, शेतकरी कामगार पक्षाच्या झुंजार, लढवय्या, अभ्यासू व्यक्तिमत्त्व आणि भाषेवर प्रभुत्व असणाऱ्या रायगडची मुलुख मैदानी तोफ म्हणून ज्यांचा गौरव केला जायचा अशा माजी राज्यमंत्री, आमदार मीनाक्षीताई पाटील यांचे शुक्रवारी (दि.29) मार्च रोजी देहावसान झाले.

रायगड जिल्ह्यात शिक्षण क्षेत्रात पाटील कुटुंबियांचे मोठे योगदान आहे, लोकनेते अँड. दत्ता पाटील, रायगडचे भाग्यविधाते प्रभाकर पाटील, आमदार जयंत पाटील, मीनाक्षी पाटील यांच्या प्रयत्नाने रायगड मध्ये खेडोपाड्यात शिक्षणाची गंगा आणली त्याच प्रमाणे मीनाक्षी पाटील यांचा प्रगल्भ अभ्यास, रोखठोक भूमिका, झुंजार नेतृत्वाच्या जोरावर त्यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात पाटील कुटुंबाचे नाव उंचावले. वयाच्या 76 व्या वर्षी शुक्रवारी अखेरचा श्वास घेतला आणि महाराष्ट्र एका कर्तृत्ववान व्यक्तिमत्वाला मुकला.

एक खंबीर नेतृत्व व अभ्यासू व्यक्तिमत्त्व असणाऱ्या मीनाक्षीताई पाटील यांना पीएनपी एज्युकेशन सोसायटीचे मुख्य कार्यालय, जिल्ह्यातील सर्व प्राथमिक, माध्यमिक, उच्चमाध्यमिक, इंग्रजी माध्यमाच्या शाळा, कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयांमध्ये शनिवारी सर्व शाळांचे मुख्याध्यापक, महाविद्यालयांचे प्राचार्य, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी मीनाक्षीताई पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांनी केलेल्या आजवरचे कार्य आणि आठवणींना उजाळा देऊन आदरांजली वाहिली.

Exit mobile version