राष्ट्रीय खेळाडू वैभव इसामेचा सत्कार

| पनवेल | वार्ताहर |

खारघरमधील स्वप्नपूर्ती गृह संकुलात सांस्कृतिक उत्सव मंडळामार्फत स्वप्नपूर्ती संकुलातील उदयन्मुख खेळाडू वैभव दिलीपकुमार इसामे याचा सत्कार कोकण शिक्षण विभागाचे माजी आमदार बाळाराम पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.

माझी खेळाविषयी आवड असल्यामुळे मी नेहमीच खेळाडूच्या मागे उभा राहतो, असे बाळाराम पाटील यांनी सांगून वैभव यास पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी पनवेल कृषी उत्पन्न बाजार समितीचे सदस्य देवा मडवी, संस्थेचे संस्थापक शरद बिबवे, अध्यक्ष सचिन बारवे, सेक्रेटरी संदीप खोचरे उपाध्यक्ष मनोज मोहोळ, खजिनदार नागेश सावंत, तसेच मंडळाचे कार्यकर्ते सभासद आणि महिला वर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

या मंडळामार्फत सामाजिक उपक्रम म्हणून रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. यामध्ये सुमारे 67 सभासदांनी रक्तदान केले. याचवेळी मेडिकव्हर हॉस्पिटलच्या माध्यमातून मोफत आरोग्य शिबिर आणि डोळे तपासणी करण्यात आली. 15 ऑक्टोबर रोजी श्री गणेश प्रासादिक मंडळ (अंजनूर) 16 ऑक्टोबर रोजी जय दुर्गा माता भजन मंडळ (मुर्बी) यांचे संगीत भजनाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. याच दरम्यान महिलांसाठी संगीत खुर्ची, मुलांसाठी चित्रकला स्पर्धा, आणि महिलांसाठी मंगळागौर कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

कोण आहे वैभव..
ऑल इंडिया नॅशनल चॅम्पियनशिप जयपुर येथे झालेल्या ॲथलेटिक 100 मीटर स्पर्धेत महाराष्ट्राकडून वैभवने प्रतिनिधित्व केल. 10.51 सेकंद टाईम देऊन महाराष्ट्रासाठी सुवर्णपदक पटकावले आणि तेथून त्याची निवड नेपाळ येथे होणाऱ्या इंडो-नेपाळ इंटरनॅशनल चॅम्पियनशिपमध्ये भारताकडून प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली. नेपाळ काटमांडू येथे झालेल्या इंटरनॅशनल चॅम्पियनशिपमध्ये ॲथलेटिक 100 मीटरमध्ये वैभवनेे 10.37 सेकंद टाईम देऊन भारतासाठी सुवर्णपदक पटकावले.
Exit mobile version