। अलिबाग । प्रतिनिधी ।
अलिबाग येथील प्रभाकर पाटील सार्वजनिक वाचनालय, तालुका ग्रंथालय तसेच, स्व.प्रभाकर पाटील सांस्कृतिक मंचातर्फे रामनारायण सभागृहात शुक्रवारी (दि.21) प्रभाकर पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त मंचाचे अध्यक्ष सखाराम पवार यांच्या हस्ते अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक रायगड जिल्हा मराठी पत्रकार संघाचे उपाध्यक्ष आणि मंचाचे कार्यवाह नागेश कुळकर्णी यांनी केले. तसेच, रायगड जिल्हा ग्रंथालय संघातर्फे प्रभाकर पाटील सार्वजनिक वाचनालयाच्या ग्रंथपाल ज्योती म्हात्रे यांना ‘उत्कृष्ट ग्रंथपाल’ पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल मंचाचे अध्यक्ष सखाराम पवार यांच्या हस्ते गौरविण्यात आले. यावेळी जेष्ठ साहित्यिक राजाराम भगत, जेष्ठ लेखक शरद कोरडे, कोमसापचे सहकार्यवाह नंदु तळकर, विनोद टेंबुलकर, भालचंद्र वर्तक, ग्रंथपाल ज्योती म्हात्रे, हेमकांत सोनार, झेबा कुरेशी आदी यावेळी उपस्थित होते.