गावातून काढली भव्य मिरवणूक
| पाली । वार्ताहर ।
भारतीय सैन्य दलात सेवानिवृत्त झालेल्या सुधागड तालुक्यातील नाडसुर येथील सैनिक संदेश शंकर बारस्कर यांचा गावकर्यांनी अनोख्या पद्धतीने जल्लोषात स्वागत केले. 4 सप्टेंबर रोजी ढोल ताशे व बॅन्ड पथकाच्या गजरात पालीतील शिवाजी चौक येथील छ्त्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे दर्शन घेऊन त्यांच्या मूळ गाव नाडसूर गावातून भव्य मिरवणूक काढण्यात आली.
बारस्कर हे वयाच्या 20व्या वर्षी जुन 2002 मध्ये भारतीय सेनेच्या बॉर्डर सेक्युरिटी फोर्समध्ये ीेश्रवळशी म्हणून निवड झाली. ट्रेनिंग-जोधपूर, राजस्थान (13 महिने) पार पाडून पहिली पोस्टिंग काश्मीरमध्ये 28 बटालियनमध्ये झाली. लान्स नायक, नायक, हवालदार असे प्रमोशन घेत हवालदार या पदावरून सेवानिवृत्ती घेतली. पाकिस्तान बॉर्डर, बांगलादेश बॉर्डर, चीन बॉर्डरवर नोकरी पार पडली. मधला काही काळ नवीन भरती होऊन येणार्या जवानांना ट्रेनिंग सेंटरमध्ये प्रशिक्षण ही दिले. नोकरीचे 20 वर्षे पार करून मेघालय मधून सेवानिवृत्त झाले.
गावातील नागरीक, व्यावसायीक, ग्रा.पं.कार्यालय, विविध संघटना,अधिकारी पदाधिकारी यांनी त्यांचे स्वागत केले. याप्रसंगी खाडे, देसाई परिवार तर्फे तसेच माजी जिल्हापरिषद सदस्य सुरेश खैरे,अनुपम कुलकर्णी, नरेश खाडे, राजेश मपारा, संदेश शेवाळे, आरिफ मनियार आदि मान्यवरांनी त्याचा सन्मान केला. कार्यक्रमाला गाव व परिसरातील बहूसंख्य नागरीक, महिला, विद्यार्थी, माजी सैनिक, अधिकारी, पदाधिकारी, आजी सैनिक असा प्रचंड जनसमुदाय उपस्थित होते.