शेकाप नेते मोहन पाटील यांना श्रध्दांजली

पेण । प्रतिनीधी |
शेतकरी कामगार पक्षाचे नेते, माजी राज्यमंत्री मोहन पाटील यांना आठव्या स्मृतीदिनी रविवारी (24 जुलै) वाक्रुळ येथे मान्यवरांसह कार्यकर्त्यानी आदरांजली अर्पण केली.
यावेळी शेकाप सरचिटणीस आम.जयंत पाटील यांच्यासह माजी आ.धैर्यशील पाटील, जि.प.सदस्या निलिम पाटील,श्रीमती विजया पाटील, कन्या शिल्पा पाटील क्रांती पाटील आदी कुटुंबियांसह आ. रवीशेठ पाटील जि.प.सदस्य सुरेश खैर,शेकाप जिल्हा चिटणीस अ‍ॅड. आस्वाद पाटील, प्रभाकर( हरी ओम) म्हात्रे, डी बी पाटील, महादेव दिवेकर, जि.प.सदस्या चित्रा पाटील,शेकाप महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील, माजी नगराध्यक्ष संतोष शृंगारपरे, नगरसेवक राजू वारकर, सुनीता जोशी, शोमेरे पेणकर, ममता पाटील, संतोष पाटील, नगरसेवक पांडुरंग जाधव, महेंद्र पोटफोडेस पेण, सुधागड, रोहा तालुक्यातील पंचायत समिती पदाधिकारी, सरपंच, उपसरपंच, सदस्य आदींसह जिल्हयातून असंख्य पदाधिकारी कार्यकर्ते व मोहन पाटील यांचे असंख्य चाहते उपस्थित होते.
यानिमित्त ह.भ.प. संतोष महाराज पायगुडे (पुणे) यांचे हरीकिर्तन आयोजित करण्यात आले होते. त्यांना साथकरी म्हणून पेण, सुधागड, रोहा, खालापूर, तालुक्यातील वारकरी मंडळ मदत केली. मोहन पाटील यांच्या प्रतिमेचे यावेळी विधीवत पूजन करण्यात करण्यात आले.त्यानंतर उपस्थित कार्यकर्त्यांनी त्यांना अभिवादन केले. मोहन पाटील यांची शिकवण अंगीकृत करून मार्गक्रमण करण्याचा निर्धार यावेळी अनेकांकडून व्यक्त करण्यात आला

Exit mobile version