रूग्णवाहिकेचे लोकार्पण करून शिवरायांना मानवंदना

जे.एम.म्हात्रे चॅरीटेबल संस्थेचा स्तुत्य उपक्रम
। पनवेल । वार्ताहर ।
शिवजयंतीचे औचित्य साधून जे.एम.म्हात्रे चॅरिटेबल संस्थेच्या पुढाकाराने खांदा कॉलनी, पनवेल आणि नवीन पनवेल मधील रुग्णांसाठी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांच्या संकल्पनेतून ना नफा, ना तोटा या तत्वावर रुग्णवाहिका लोकार्पण सेवेचा शुभारंभ करण्यात आला.

या कार्यक्रमाच्या वेळी शेतकरी कामगार पक्षाचे जिल्हा चिटणीस गणेश कडू, नगरसेविका डॉ.सुरेखा मोहकर, प्रीती जॉर्ज म्हात्रे, सारीका भगत, कुसुम गणेश पाटील, मा.उपनगराध्यक्ष गणेश पाटील, शेकाप खांदा कॉलनी अध्यक्ष अनिल बंडगर, कार्याध्यक्ष योगेश कोटेकर, शेकाप महिला आघाडी अध्यक्ष दर्शना भडांगे, शेकाप महिला आघाडीच्या माधुरी गोसावी, शेकाप महिला आघाडी पदाधिकारी, ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Exit mobile version