| पोलादपूर | प्रतिनिधी |
तालुक्यातील धारवली ग्रुप ग्रामपंचायतीच्या सरपंच अश्विनी विश्वास सातपुते यांच्या हस्ते, तर माजी सैनिक संदीप जैतपाल यांच्या हस्ते रिंगीचा तलाव आंग्रेकोंड येथे ध्वजारोहण करण्यात आले.
दरम्यान, 75 वर्षे वय उलटून गेलेल्या ज्येष्ठ नागरिकांचा स्वातंत्र्याचे साक्षीदार म्हणून सन्मान करताना कोव्हिडयोद्धा म्हणून पत्रकार, अंगणवाडी सेविका व मदतनीस, डॉक्टर्स, कर्मचारी, आशा सेविका यांचा सत्कारही करण्यात आला. यावेळी बीएसएफ एअरविंगमध्ये निवड झाल्याबद्दल प्रितेश सकपाळ या तरुणाच्या कुटुंबियांचा गौरव करण्यात आला. कोव्हिडकाळात नोडल अधिकारी प्रदीप पवार, धारवली ग्रामसेवक उमेश मनवे, ग्रामपंचायत कर्मचारी भिकोबा कुळे, पूरकाळामध्ये व कोव्हिड काळामधील सहकार्याबद्दल वावे वेल्फेअर सोसायटीचा विशेष सन्मान करण्यात आला.
पंचायत समितीच्या कृषी विभागाचे झोनल अधिकारी अरूण धिवरे यांच्या सहकार्यातून विविध उपक्रम राबविण्यात आले. याकामी सरपंच अश्विनी सातपुते, उपसरपंच सिराज फकीर, तंटामुक्ती अध्यक्ष सिध्दार्थ सकपाळ, ग्रा.पं.सदस्य विलास सकपाळ, सईद करबेलकर, बाळाराम चाचले, नसिमा चाफेकर, भाग्यश्री वरवाटकर, सरिता जैतपाल, दिप्ती जंगम, रहेमत काझी, सामाजिक कार्यकर्ते हर्षल सातपुते, विश्वास सातपुते, पोलीस पाटील रोशन सकपाळ, मुख्याध्यापक प्रदीप पवार आणि अतुल तडवी आदींच्या सहकार्याने तीन दिवसांमध्ये अनेकविध उपक्रम राबविण्यात धारवली ग्रुपग्रामपंचायतीला यश आले.