| पेण | प्रतिनिधी |
पेण शहरात दुपारी 3 वाजता वृत्त पत्रांनचे प्रतिनिधी वेगवेगळया वाहिन्यांचे प्रतिनिधी, युटयुब वाहिन्यांचे प्रतिनिधी व माजी सैनिक. यांनी एकत्र येउन तिरंगा रॅलीचे आयोजन करुन देशाप्रती असलेले प्रेम प्रकट केले.
पेण महात्मा गांधी वाचनालयापासून निघालेली ही रॅली आंबेडकर चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, महावीर मार्ग, पं. का. पाटील चौक, राजू पोटे मार्गे, कोतवाल चौक अशा मार्गाने ही रॅली फिरली. या रॅलीमध्ये जोरदार घोषणा दिल्या मफभारत माता की जय, वंदे मातरम्, भारताचा विजय असो, इन्क्लाब झिंदाबाद, सबसे प्यारा तिरंगा हमारा, या घोषणा ऐकूण शेकडो पेणकरांनी प्रसार माध्यमांच्या तिरंगा रॅलीमध्ये सहभाग घेतला.
या काँग्रेसचे अशोक मोकल, नंदा म्हात्रे, राष्ट्रवादीचे माजी नगराध्यक्ष संतोष श्रृंगापूरे, मा.उपनगराध्यक्षा वसुधा पाटील, नगरसेवक निवृत्ती पाटील, विशाल बाफणा, मनसेचे संदीप ठाकूर, संसारे, समाजसेविका वैशाली पाटील, राजन क्षेमसे, श्री ठाकूर, तसेच मा. सैनिक संघटनेचे अध्यक्ष सुरेंद्र ठाकूर व त्यांचे सहकारी, सह्याद्री प्रतिष्ठानचे महाराष्ट्र उपाध्यक्ष समीर म्हात्रे, समाजसेवक हरेश बेकावडे, भारती सिंगासने, शिवा सिंगासने यांच्यासह शेकडो पेणकरांनी या पत्रकारांच्या तिरंगा रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या रॅलीची सांगता नगरपालिका कार्यालयासमोर झाली.