| रोहा | प्रतिनिधी |
रोहा तालुक्यातील खांबेरे ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच गिता वारगुडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी ग्रामपंचायत हद्दीतील विविध नागरिक, विद्यार्थी व मोठ्या संख्येने महिला सहभागी झाल्या होत्या. ग्रामस्थांना गाव स्वच्छ ठेवणे तसेच निपुण भारत याची शपथ देण्यात आली. मुख्याध्यापिका वर्षाराणी मुंगसे व टेमघर शाळेचे मुख्याध्यापक सुरेश भोईर यांनी सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले होते.
प्लास्टिकचा वापर टाळावा.तसेच सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता राखली जावी या विषयावर विद्यार्थानी नाटिका सादर करून उपस्थितांची मने जिंकली.या कार्यक्रमात ग्रामपंचायत सदस्य बबन पडवळ,आतिष मोरे,आत्माराम कासार,मयुरी मोरे,मनिषा फळसकर,दिप्ती गिजे,वंदना पवार तसेच राजिप शाळा बिरवाडी मुख्याध्यापक रेणुका परदेशी,तसेच सहशिक्षक राम वाघ,गोविंद भला ग्रामपंचायत हद्दीतील सर्व अंगणवाडी सेविका व मदतनीस तसेच ग्रामपंचायत शिपाई निशांत बिरवाडकर, संगणक कर्मचारी पूनम फळसकर,पत्रकार जितेंद्र जोशी उपस्थित होते.
गायचोळ केंद्राच्या अंगणवाडी सेविका निलिमा शेडगे यांनी देशभक्तीपर गीत सादर केले.ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक राजेंद्र पाटील यांनी ग्रामपंचायत हद्दीत अमृतमहोत्सवी वर्धापनदिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यासाठी सर्वांनी केलेल्या सहकार्याबद्दल सर्वांचे आभार व्यक्त केले.य ावेळी खांबेरे गाव जलजीवन मिशन अंतर्गत हर घर नळ योजनेत परिपूर्ण गाव म्हणून तर खांबेरे ग्रामपंचायत हद्दीतील सर्व गावे स्वच्छ भारत अभियान टप्पा 2 अंतर्गत राबविण्याचे ठरविण्यात आले. उपस्थित ग्रामस्थांना अल्पोपहार व चहा देऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.