| चिरनेर | वार्ताहर |
उरण तालुक्यातील वेश्वी येथील रुक्मिणी त्रिंबक मुंबईकर यांचे नुकतेच वृद्धापकाळाने निधन झाले आहे. निधनासमयी त्यांचे वय 84 वर्षाचे होते. शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा उरण पंचायत समितीचे माजी सदस्य, तसेच वेश्वी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच त्रिंबक मुंबईकर यांच्या त्या पत्नी होत्या. त्यांच्या पश्चात चार पुत्र, दोन विवाहित कन्या, सुना, जावई व नातवंडे असा आप्त परिवार आहे. त्यांचा उत्तरकार्यविधी 14 जुलै रोजी वेश्वी येथील राहत्या घरी दुपारी ठीक बारा वाजता होणार असल्याची माहिती मुंबईकर परिवारातर्फे देण्यात आली.