बाईकवरुन ट्रिपल सीट प्रवासाला परवानगी मिळेल

भाबेश कालितांचे वक्तव्य
। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
देशातील इंधनवाढ हा चिंतेचा आणि ज्वलंत विषय बनलेला असताना आसाम भाजपाचे अध्यक्ष भाबेश कालिता यांनी पेट्रोलसंदर्भात विस्मयजनक वक्तव्य केले आहे. पेट्रोलचे दर 200 रुपये लिटरच्या पुढे गेल्यास ट्रीपल सीट प्रवास करण्याची मूभा आसामध्ये देण्यात येईल, असे हे विधान आहे.
सर्वसामान्यांना महागाईची झळ बसत असताना त्यासाठी प्रयत्न करायचे सोडून जो-तो राजकारणी प्रसिद्धीच्या झोतात येण्यासाठी काहीही विधाने करत सुटतोय. केंद्रात सत्ता असूनही हा प्रकार भाजप नेत्यांकडूनही हा प्रकार घडतो आहे. मागील 20 दिवसांमध्ये तब्बल 15 वेळा इंधनदरवाढ झालीय. ही दरवाढ योग्य किंवा अनिवार्य असल्याचे खुलासे करताना वाटेल ती स्पष्टीकरणे देत आहेत.
इंधनदरवाढीवर भाष्य करताना भाजप नेत्यांनी तालिबानला दोष देणे, निर्सगाच्या रक्षणासाठी सायकल चालविण्याचा सल्ला देणे आदी युक्तीवाद केले आहेत. पण भाबेश कालिता यांनी, पेट्रोलचे दर लिटर मागे 200 रुपयांवर पोहचल्यानंतर दुचाकी गाड्यांवर तिघांना प्रवास करण्यास परवानगी देण्यात येईल. तसेच एका बाईकवर तीन जणांना प्रवास करण्यासाठी परवानगी देण्यासाठी सरकारकडून सहमती घेण्यात येईल. दुचाकी वाहनांवर तीन जणांची बसण्याची सोय असणार्‍या गाड्या निर्माण करण्याची परवानगीही घेता येईल, असे विधीबाह्य विधान केले आहे.

Exit mobile version