उत्कृष्ट गोलंदाज सुमेध पात्रे; उत्कृष्ट फलंदाज विनोद वाटकरे
| रायगड | प्रतिनिधी |
शेतकरी कामगार पक्ष पुरस्कृत आणि प्रशांत नाईक मित्रमंडळ आयोजित अलिबाग चॅम्पियन्स चषक 2024 या प्रकाश झोतातील मर्यादित षटकांच्या टेनिस क्रिकेट लीग स्पर्धेची उत्कंठा शनिवारी संपली. या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात त्रिशाव्याइलेव्हन वरसोली संघाने अलिबाग चॅम्पियन्स चषकावर आपले नाव कोरले. या क्रिकेट स्पर्धेत आरसी ग्रुप अलिबाग द्वितीय, एमडी वॉरियर्स तृतीय आणि एसपी सुपर प्लेयर्स आंबेपूर या संघाने चतुर्थ क्रमांक पटकावला. तीन रात्री चाललेल्या या स्पर्धेतएसपी सुपर प्लेयर्स आंबेपूर या संघातील अष्टपैलू खेळाडू निशांत कडवे मालिकावीर ठरला. त्याला चषक आणि होंडा कंपनीची दुचाकी पारितोषिक स्वरूपात देऊन गौरविण्यात आले. त्रिशाव्याइलेव्हन वरसोली संघाचाखेळाडू सुमेध पात्रे उकृष्ट गोलंदाज ठरला. आरसी ग्रुप अलिबागचा खेळाडू विनोद वाटकरे उत्कृष्ट फलंदाज ठरला. या दोघांना आकर्षक चषक व एलईडी टीव्ही देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.
तिसऱ्या दिवशी बाद फेरीतील सामान्यांना सुरवात होण्यापूर्वी शेतकरी कामगार पक्षाचे माजी आमदार पंडित पाटील यांच्या हस्ते मैदानाचे उदघाटन झाले. यावेळी अलिबाग नगरीचेमाजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक, ॲड. आस्वाद पाटील, सवाई पाटील, आंबेपूर ग्रामपंचायत सरपंच सुमना पाटील, ॲड. गौतम पाटील, माजी नगरसेवक प्रदीप नाईक, अनिल चोपडा, वृषाली ठोसर, संजना किर, रवी थोरात, ॲड. प्रवीण ठाकूर, रवी ठाकूर, पिंट्या ठाकूर, काजल ठाकूर, ऋषी ठोसर, राहुल साष्टे, अजय झुंजारराव, ॲड. मानसी म्हात्रे, अशोक प्रधान, किहीम सरपंच पिंट्या गायकवाड आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
शेतकरी कामगार पक्ष पुरस्कृत आणि प्रशांत नाईक मित्रमंडळ आयोजित अलिबाग चॅम्पियन्स चषक 2024 या नाईट ओव्हर आर्म टेनिस क्रिकेट लीग स्पर्धा 11 जानेवारी ते 13 जानेवारी या कालावधीत खेळविण्यात आली. या स्पर्धेसाठी 16 संघांना संधी देण्यात आली होती. पहिल्या आणि दुसऱ्या दिवशी सहभागी संघांमध्ये लीग खेळविण्यात आली. यामधून बाद फेरीसाठी आठ संघ निवडण्यात आले होते. यामध्ये एसपी भार्गवी इलेव्हन, सरपंच पिंट्या गायकवाड मित्रमंडळ चोंढी, एमडी वॉरियर्स, कुबेर इलेव्हन अलिबाग, त्रिशाव्या इलेव्हन वरसोली, आरसी ग्रुप अलिबाग, एसपी सुपर प्लेयर्स आंबेपूर आणि मी हाय कोळी रिसॉर्ट अलिबाग या संघांमध्ये सामने खेळविण्यात आले. यामधून एडी वॉरियर्स, त्रिशाव्याइलेव्हन वरसोली, एसपी सुपर प्लेयर्स आंबेपूर आणि आरसी ग्रुप अलिबाग या चार संघांमध्ये सोडतीद्वारे उपांत्य फेरीचे सामने खेळविण्यात आले. यामध्ये पहिला उपांत्य फेरीचा सामनाएडी वॉरियर्स आणित्रिशाव्याइलेव्हन वरसोली या दोन संघांमध्ये खेळवलागेला. या सामन्यात त्रिशाव्याएलेव्हेनवरसोली संघाने अंतिम फेरीत धडक दिली. त्यानंतर एसपी सुपर प्लेयर्स आंबेपूर आणि आरसी ग्रुप अलिबाग या दोन संघांमध्ये दुसरा उपांत्य फेरीचा सामना खेळविण्यात आला. यामध्ये आरसी ग्रुप अलिबाग संघाने अंतिम फेरीत धडक दिली. उपांत्य फेरीमधीलदोन्ही सामने चुरशीची झाले.
त्रिशाव्याइलेव्हन वरसोली आणि आरसी ग्रुप अलिबाग या दोन संघांमध्ये अलिबाग चॅम्पियन्स ‘किताब पटकावण्यासाठी लढत झाली. हा सामना चुरशीचा होईल अशी क्रीडा रसिकांची आशा होती. परंतु हा असमानएकतर्फी झाल्याने क्रीडा रसिकांची घोर निराशा झाली. या लढतीमध्ये त्रिशाव्याइलेव्हन वरसोली संघाने प्रथम फलंदाजी करताना पाच षटकांमध्ये 51 धावांचे लक्ष्य आरसी ग्रुप अलिबाग संघाला दिले होते. अंतिम सामना खिशात घालण्याच्या इराद्याने मैदानात फलंदाजीसाठी उतरलेल्या आरसी ग्रुप अलिबागच्या फलंदाजांची 51 धावांचा पाठलाग करताना दमछाक झाली.मोठे फटके मारण्याच्या नादात आरसी ग्रुपचेभरवशाचे फलंदाज तंबूत परतले. मर्यादित षटकांमध्ये इच्छित धावा बनविण्यात आरसी ग्रुप संघाला अपयश आले. त्रिशाव्याइलेव्हन वरसोली या संघाच्या फलंदाजांसहगोलंदाजांनी उत्तम कामगिरी बजावल्याने या संघाने अलिबाग चॅम्पियन्स चषक आपले नाव कोरले.
तीन रात्री चाललेल्या अलिबाग चॅम्पियन्स चषक स्पर्धेच्या सामान्यांचे समालोचन क्रिकेट रसिकांसाठी पर्वणी ठरलीहोती. समालोचन कक्षात समालोचक संदीप जगे, यास्मिन मर्चंट, आकाश मांजरेकर, निशांत पाटील, कपिल ठाकूर, काका म्हात्रे आणि वेदांत कंटक यांची उपस्थिती होती. या समालोचकांनी आपल्या समालोचनातून क्रिकेट विश्वातील सांगितलेली माहिती क्रीडा रसिकांच्या स्मरणात राहणारीहोती. उपांत्य फेरीत दाखल झालेले चारही संघ तुल्यबळ होते. या संघातील गोलंदाज आणि फलंदाजांनी क्रीडा रसिकांच्या डोळ्यांची पारणे फेडली. निर्धाव षटके आणि उत्तुंग षटकारानेशेवटचा दिवस गाजला. अनेक दिग्गज फलंदाजांच्या मनसुब्यावरनवख्या गोलंदाजांनी पाणी फेरले पहावयास मिळाले.