| खोपोली | वार्ताहर |
मुंबई पुणे जुन्या महामार्गावर बोरघाट येथील मॅकॅनिक पॉईंटजवळ एका ट्रकला आग् लागल्याची घटना घडली. परंतु,सर्व यंत्रणा वेळेवर दाखल झाल्याने हानी टळली.
ट्रकला आग लागली असता ट्रक चालक ती आग विझवण्याचा प्रयत्न करीत असताना खोपोली पोलीस ठाण्याचे एपीआय हरेश काळसेकर आणि आयआरबी कंट्रोल येथे माहिती दिली असता खोपोली नगरपरिषद वाहन रवाना करण्यात आले. सर्व यंत्रणा वेळेवर दाखल झाल्याने अपघाताची मोठी हानी टळली.
डॉ.रणजित मोहिते हे मॉर्निंग वॉक करत असताना त्यांना हा प्रकार त्यांच्या दृष्टिपथात आल्यावर त्यांनी लगेचच मदत केली आणि सर्व यंत्रणांना संपर्क केला.
सदर वाहनाचा चालक रुपेश पाटील रा. बेलवली पनवेल याने सर्वांचे आभार मानले. आय आर बी देवदूत यंत्रणा, खोपोली नगर परिषद फायर ब्रिगेड, महामार्ग वाहतूक शाखेच्या बोरघाटचे पोलीस, खोपोली पोलीस ठाण्याचे कर्माचारी आणि अपघातची टीम यांच्या संयुक्त प्रयत्नांतून ही दुर्घटना टळली.