| मुंबई | प्रतिनिधी |
मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर एक मोठी घटना घडली आहे. अकासा एअरलाइन्सचे विमान एका मालवाहू ट्रकला धडकले आहे. अपघातानंतर एअरलाइन्सने जारी केलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, विमान उभे असताना एका थर्ड पार्टी ग्राऊंड हँडलरने चालवलेल्या मालवाहू ट्रकने विमानाला धडक दिली. अपघातानंतर टीम विमानाची सखोल चौकशी करत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई विमानतळावर एका विमानाची एका मालवाहू ट्रकला टक्कर झाली आहे. विमानाचे पंख आणि ट्रकमध्ये झालेल्या टक्करमुळे विमानतळावर काही काळ गोंधळ उडाला. हे विमान अकासा एअरलाइन्सचे होते. यानंतर एअरलाइन कंपनीने स्पष्टीकरण दिले आहे.अकासा एअरलाइन्सच्या प्रवक्त्याने सांगितले की, मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर एका तृतीय पक्षाद्वारे चालवल्या जाणाऱ्या मालवाहू जहाजाची आमच्या विमानाशी टक्कर झाली आहे. सध्या विमानाची सखोल चौकशी केली जात आहे. आम्ही तृतीय पक्षाच्या ग्राऊंड हँडलरसह घटनेची चौकशी करत आहोत, असे सांगितले.







