कर्जत उपजिल्हा रुग्णालयात ट्रूनेट मशीन दाखल

| कर्जत । वार्ताहर ।
कर्जत उपजिल्हा रुग्णालयात जिल्हा क्षयरोग केंद्र रायगड अलिबाग येथून क्षयरोगाचे निदान करण्याकरिता आधुनिक ट्रूनेट मशीन तपासणीसाठी देण्यात आली आहे. या पूर्वी क्षयरोगाचे थुंकी नमुने व पाठीतील या मणक्यातील पाणी तपासणीकरिता अलिबाग, एम जी एम कामोठे येथे पाठवण्यात यायचे मात्र आता या ट्रूनेट मशीनमुळे या तपासण्या कर्जत येथे होणार आहते. या यंत्राचे उदघाटन उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकिय अधिक्षक डॉ. मनोज बनसोडे, वैद्यकिय अधिकारी डॉ. वसंत भालशंकर यांच्या हस्ते करण्यात आले. सदर केंद्राचे कामकाज प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी अजय बिडवे व रुपाली जगताप या पाहणार आहेत. या प्रसंगी क्षयरोग पर्यवेक्षक नितीन पाटील, अरुणा येल्वे, सारिका मोकल तसेच प्रयोगशाळा विभागातील तथा उपजिल्हा रुग्णालयातील कर्मचारी उपस्थित होते. ट्रूनेट कंपनीचे इंजिनिअर ओमकार सोनावणे यांचे सहकार्य लाभले. या आधुनिक यंत्रामुळे क्षयरोगाचे निदान करण्याकरिता गरजू रुग्णांनी मोफत तपासणीचा लाभ घेण्यात यावा असे आवाहन उपजिल्हा रुग्णालयाच्यावतीने करण्यात आले आहे.

Exit mobile version