महाविकास आघाडीत जागावाटपावरुन रस्सीखेच

शिवसेनेचा 23 जागांचा प्रस्तान काँग्रेसला अमान्य


| मुंबई | वृत्तसंस्था |

लोकसभेच्या जागावाटपाबाबत महाविकास आघाडीत सध्या बराच संभ्रम निर्माण आहे. शिवसेने राज्यातील 23 जागाचा प्रस्ताव ठेवला असून काँग्रेसने मात्र, तो अमान्य केला आहे. त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपाबाबत रस्सीखेच सुरु आहे. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात दिल्लीत महाविकास आघाडीतील नेत्यांची बैठक पार पडणार आहे. त्याबैठकीतच यावर निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

कोण किती जागा लढणार हे दिल्लीमध्ये ठरणार आहे. आम्ही जिंकलेल्या 18 जागांवर चर्चा करायची नाही, हे आधीच ठरलेलं आहे. जिथे काँग्रेसची ताकद तिथे काँग्रेस निवडणूक लढवेल. उद्धव ठाकरेंची दिल्लीमध्ये वरिष्ठांशी चर्चा सुरु आहे. ठाकरे आणि शरद पवार यांच्यामध्ये उत्तम संवाद आहे. आमच्यात चर्चा सुरु आहे. मतभेद असण्याचे कारण नाही, असे संजय राऊत म्हणाले.

लोकसभा जागावाटपाची अंतिम चर्चा ही हायकमांडसोबतच होईल, असे काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले. हायकमांडसोबतच्या बैठकीत सगळ्याचं ऐकून घेतलं जाईल. आम्ही आमची बाजू मांडू. शिवसेना (ठाकरे गट), काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) यांची महाविकास आघाडी आहेच. इतर कोणाला सोबत घ्यायचे यासंदर्भात चर्चा करू. किती जागा हव्या आहेत त्याबद्दल मी बोलणार नाही. महाविकास आघाडीच्या बैठकीत जे ठरेल त्यावरच अंमल करू, असेही वडेट्टीवार म्हणाले.

त्यामुळे या बैठकांमध्ये जागावाटपाबाबत काय निर्णय होणार आणि महाविकास आघाडीत कोणतं समीकरण ठरणार याची उत्सुकता सध्या राजकीय वर्तुळात लागली आहे.

Exit mobile version