। मुंबई । वृत्तसंस्था ।
शिवसेनेत बंडाळी झाल्यापासून महाविकास आघाडीतील तिनही पक्षांचे ‘एकला चलो रे’चे धोरण पहायला मिळालं आहे. याचे पडसाद राज्यसभेच्या निवडीवेळीच उमटले होते पण ते आता प्रकर्षाने समोर येताना दिसत आहेत. विधानपरिषदेच्या निवडीवेळीच महाविकास आघाडीतील प्रत्येक पक्षाने अप्रत्यक्षरित्या आपापले उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रयत्न केला होता. पण काँग्रेसच्या चंद्रकांत हंडोरे यांचा पराभव झाल्यानंतर आरोप प्रत्यारोप सुरू झाले होते. त्यानंतर राज्यात सत्तांतर झाल्यावर आता महाविकास आघाडीतील मित्रपक्षांची नाराजी उघड होत आहे.
शिवसेनेने विधानपरिषदेच्या विरोधीपक्षनेतेपदी आमदार अंबादास दानवे यांची निवड केल्यानंतर महाविकास आघाडीत नाराजीचा सूर उमटला आहे. आम्हाला या निवडीवेळी विश्वासात घेतलं नसल्याचं मत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केलं आहे. त्यांच्या या वक्तव्यावरून महाविकास आघाडीत नवा ट्वीस्ट आला आहे.
“आमची नैसर्गिक आघाडी नसून ही आघाडी एका विपरीत परिस्थितीत तयार झाली आहे. आम्ही विरोधीपक्षात बसणार होतो पण जी युती झाली ती पर्मनंट नाही.”
नाना पटोले