। पेण । वार्ताहर ।
स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सवानिमित्त अधीक्षक अभियंता पेण मंडल इब्राहिम मुलाणी यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीतर्फे हर घर तिरंगा महोत्सवांतर्गत दि. 9 ऑगस्ट रोजी पेण मंडल कार्यालय येथे सकाळी 11 वाजता समूह राष्ट्रगीत गायन करण्यात आले. यावेळी पेण मंडळाचे कार्यकारी अभियंता (प्रशासन) प्रकाश खांडेकर, व्यवस्थापक (मानव संसाधन) शंकर कुलकर्णी, इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. यावेळी अधीक्षक अभियंता इब्राहिम मुलाणी यांनी महावितरण कंपनीतर्फे सर्व कर्मचारी तथा कार्यालयांनी या महोत्सवमध्ये सहभाग घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.