| पनवेल | प्रतिनिधी |
तुकाराम दुधे यांची 55 लाख 29 हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी पनवेल शहर पोलीस ठाण्यात फजल रेहमान गुलाब नाबी अन्सारी (रा. बाळापूर, अकोला) आणि महाजनको कंपनीचे इंजिनियर यांच्याविरोधात 30 नोव्हेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला.
फजल अन्सारी याने त्याच्या मेसर्स साई अँश पाँड् ट्रान्सपोर्टिंग कंपनीला महाजनको पारस या औष्णिक ऊर्जा प्रकल्पामध्ये टेंडर मिळाले असून, टेंडरच्या अनुषंगाने कंपनीने एकूण एक कोटी 85 लाख 39 हजार 207 इतकी रक्कम भरलेली आहे असे सांगितले. आणि तेवढ्या रकमेच्या महाजनकोच्या पावत्या दाखवून तुकाराम दुधे यांच्याकडून कंपनीमध्ये 30 टक्के भागीदार म्हणून 55 लाख 29 हजार रुपये मे. साई अँश पाँड् ट्रान्सपोर्टिंग कंपनीच्या बँक खात्यावर स्वीकारली. त्यानंतर आरोपीने डिसेंबर 2023 ते जानेवारी 2024 या कालावधीमध्ये महाजनकोमधून 419 रुपये दराने राखाडी विकत घेऊन ती पुढे 540 रुपये या दराने विक्री करून एकूण 9 हजार 246 मेट्रिक टन राखाडी विकली आणि दुधे यांनी गुंतवलेल्या रकमेवरती कमाई करून आणि तसे करण्यासाठी महाजनको कंपनीचे इंजिनियर यांनी खोट्या पावत्या, इतर कागदपत्रे बनवून देऊन त्याद्वारे दुधे यांचा विश्वास संपादन केला आणि गुंतवलेली रक्कम 55 लाख 29 हजार रुपये आणि त्या बदल्यात कोणत्याही मोबदला न देता तुकाराम दुधे (रा. भारत गॅसजवळ, पनवेल) यांची फसवणूक केली.