। गोवे-कोलाड । वार्ताहर ।
रोहा तालुक्यातील मौजे चिल्हे येथील तसेच खांब पंचक्रोशीचे मूळ मार्गदर्शक हभप नारायण दादा लोखंडे यांचे ज्येष्ठ सुपूत्र हभप तुकाराम लोखंडे वय वर्ष (74) यांचे शुक्रवारी (दि.11) अल्पशा आजाराने निधन झाले. वारकरी संप्रदाय परंपरा जोपासणार्या वडिलांच्या पश्चात तुकाराम लोखंडे यांनी परिवाराची जबाबदारी खांद्यावर घेत यांनी कोलाड पाटबंधारे विभागात उत्तमरिता काम करत सेवा निवृत्तीनंतर त्यांनी शेती व्यवसाय बरोबर फळ बागायतीचा संभाळ केला. त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी, दोन मुले, एक मुलगी, एक भाऊ, दोन बहिणी, पुतणे, सुना नातवंडे असा मोठा लोखंडे परिवार असून त्यांचे पुढील दशक्रिया विधी रविवारी (दि.20) व उत्तरकार्य बुधवारी (दि.23) त्यांच्या राहत्या निवास्थांनी मौजे चिल्हे येथे होणार आहे.